भुसावळ- भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात दंगल तसेच हाणामारीच्या गुन्ह्यात पसार असलेल्या आरोपीला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली. रोहित दीपक गुप्ता (23, रा.नसरवांजी फाईल, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीविरुद्ध भाग पाच, गुरनं.42/2019 अन्वये 15 जानेवारी 2019 रोजी गुन्हा दाखल होता. गुन्हा घडल्यानंतर संशयीत आरोपी रोहित गुप्ता हा पसार असल्याने त्याचा शोध सुरू होता. आरोपी शिवाजी नगर भागात आल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यास अटक करण्यात आली. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड, पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनखाली पोलिस उपनिरीक्षक मनोज ठाकरे, पोलिस ना