शहादा। शहरात पाण्याच्या वादावरुन उसळलेल्या दंगलीत एम. आय. एम. चे नगरसेवक सद्दाम तेलीच्या भोसकून खुन केल्याप्रकरणी अनेक ठिकाणी जाळपोळीच्या व लुटमारीच्या घटना घडल्या आहेत त्या घटनेत रियाज कुरेशी या नगरसेवकाचे घराचे मोठे नुकसान करुन सुमारे 4 लाख 36 हजार रोख रकमेसह सोन्याचांदीचे दागीने चोरुन नेले व सुमारे 3 लाखाचे घराचे नुकसान केल्याची घटना घडली असून याबाबत पोलीसांनी सात संशयीयाना ताब्यात घेउन न्यायालयात हजर केले असता 22 जुनपर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. दि.14 रोजी बुधवारी गरीब नवाज कॉलनीत पाण्याचा वादावरुन दोन गटात तुफान हाणामारीची घटना झाली या घटनेत नगरसेवक सद्दाम तेलीच्या भोसकुन खुन झाला होता.
सुमारे 4 लाख 36 हजार रूपये वस्तुंची लूट
गरीब नवाज कॉलनीत संतप्त जमावाने खुन केल्याप्रकरणातील आरोपींच्या व त्यांच्या नातेवाईकांची घरे व दुकाने जाळून करोडो रुपयाचे नुकसान केले. यात जमावाने 15 जुन रोजी गरीब नवाज कॉलनीतील रहिवासी असलेले नगरसेवक रियाज कुरेशी हे भाजपाला मदत करतात या कारणास्तव संतप्त जमावाने कुरेशी यांच्या घरात घुसुन सुमारे 4 लाख 36 हजार रु व सोन्या चांदीचा वस्तु ची लुट करुन सुमारे 3 लाख रु किमतीच्या घराची तोडफोड करुन जाळपोळ केली. म्हणून याबाबतीत शहादा पोलीसात रियाज कुरेशी यांच्या फिर्यादीवरुन सुमारे 150 जणाविरुद्ध जाळपोळ व लुटमारीच्या 395, 307 प्रमाणे गुन्हा दाखल केला. या प्रकरणात पोलीसांनी आतापर्यंत सात जणाना सापळा रचुन ताब्यात घेतले आहे. यात अकबर शहा,नजीर शहा, मुक्तार सै. नवशाद ,मोईन बेलदार , शेख आसीफ , शेख मोहसीन रफीक मेहत्त्तर , रहीम बेलदार सलमान खाटीक आदीना अटक करुन न्यायालयात हजर केले असता सदर संशयीत आरोपीना 22 जुनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी संशयीत संतप्त जमावाने चोरुन नेलेल्या आरोपींच्या साहित्य जसे दरवाजा, खिडक्या, पलंग आदि साहित्य भितीपोटी रामरहीम नगर मधील मशिदीजवळ स्वत:हुन टाकुन जात असल्याचे आढळून आले आहे.