दंगलीतील चौघांचे जामीन न्यायालयाने फेटाळले

0

जळगाव । हरीविठ्ठलनगरात 11 फेब्रुवारी रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास पुर्ववैमनस्यातून दोन तरूणांना बंदुकीचा धाक दाखवून तलवारीने वार करून बेदम मारहाण केली. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात दंगलीचा, अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पाच संशयिताना पोलिसांनी अटक केली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणातील चार संशयितांनी अतिरीक्त सत्र न्यायधीश ए. के. पटणी यांच्या न्यायालयात दाखल केलेले जामीन अर्ज बुधवारी फेटाळले आहेत.

पुर्ववैमनस्यातून पुन्हा वाद
हरीविठ्ठलनगरात 2015 साली नवरात्रोत्सवात दोन गटात तुफान हाणामारी झाली होती. तेव्हापासून या दोन्ही गटात नेहमीच वाद सुरू असतात. 11 फेब्रुवारी रोजी दुपारी संदीप अशोक यशोद (वय 25, रा. हरीविठ्ठलनगर) हा शहरात जात असताना प्रभात कॉलनी चौकात राहूल सुरेश हटकर (वय 25, रा. हरीविठ्ठलनगर) आणि गेंडा तडवी याच्याशी वाद झाला. त्यानंतर काही वेळाने भजे गल्लीत ललीत देवरे याच्याशी वाद झाला. रात्री 11.30 वाजेच्या सुमारास संदीप त्याचा भाऊ किरण यशोद याला जेवणाचा डबा देण्यासाठी जात होता. त्यावेळी हरी विठ्ठलनगर रिक्षा थांब्याजवळ संदीप आणि त्याचा मित्र आकाश दिलीप मोरे (वय 25, व्यंकटेशनगर) यांना प्रमोद इंगळे, कैलास हटकर, राहूल हटकर, बंटी राजू कोळी (वय 24), राजू धोंडू कोळी (वय 52), गेंडा तडवी, ललीत देवरे, मॉण्टी कोळी, पंकज कुमावत (सर्व रा. हरीविठ्ठलनगर) यांनी मारहाण केली होती. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पाच संशयीताना अटक केली होती. त्यापैकी प्रमोद इंगळे, कैलास हटकर, सागर कोळी, हर्शल कोळी, यांनी न्यायाधीश पटणी यांच्या न्यायालयात जामीनासाठी दाखल केलेले अर्ज बुधवारी फेटाळले आहेत. सकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी कामकाज पाहिले.