जळगाव – हळदीच्या कार्यक्रमात नाचतांना धक्का लागल्याच्या कारणावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी होवून दंगलीची घटना १९ रोजी रात्री तांबापुरा परिसरात घडली. यात फरार समीर उर्फ मुन्ना सलीम पटेल वय २३ रा. दत्तनगर, मेहरुण यास पोलिसांनी २६ रोजी अटक केली. न्यायालयात हजर केले असता त्यास २८ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे
दंगलीच्या घटनेप्रकरणी दोन्ही गटाचे संशयित अटकेत असुन कोठडीत आहेत. समीर हा गुन्हा घडल्यापासून फरार होता तो सुप्रीम कॉलनी येथे आल्या बाबतची माहिती पोलिस निरीक्षक रणजित शिरसाठ यांना मिळाली. त्यानुसार शिरसाठ यांनी पोलीस कॉन्स्टेबल सचिन चौधरी, मुकेश पाटील, योगेश बारी, सचिन पाटील, या पथकाला ताब्यात घेण्याचा सूचना केल्या. पथकाने २६ रोजी रात्री समीेरला ताब्यात घेतले. त्यास शुक्रवारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांनी न्यायालयात हजर केले असता समीरला दि. 28 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे