जळगाव : तालुक्यातील रिधूर गावी रस्त्याचे काम सुरु आहे. त्या कामासाठी ग्रामपंचायतीच्या विहिरीवरून टँकरने पाणी नेल्याच्या कारणावरून वाद होवून हाणामारी झाल्याची घटना घडली. याबाबत तालुका पोलिसात दंगलीचा गुन्हा दाखल झाला होता.
याप्रकरणी पोलीसांनी पोलीस कोठडीत असलेल्या बाराही संशयितांना आज न्या. एम.एम.चौधरी यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
पोलीस कोठडीतील संशयीत न्यायालयात हजर
रिधूर गाव शिव रस्याचे काम सुरु आहे. या रस्त्यांच्या कामांसाठी नामदेव उर्फे पिंटु शालिग्राम पाटील याने ठेकेदाराच्या टँकरने ग्रामपंचायतीच्या विहिरीवरून रस्त्यांच्या कामांसाठी पाणी नेल्याचा राग येवून नामदेव पाटील, शरद पुंडलिक पाटील व सुभाष दोधु पाटील या तिघांना मारहाण झाली होती. या घटनेप्रकरणी नामदेव पाटील यांच्या फिर्यादीवरून संशयितांविरुध्द दंगलीचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी अटक सत्र सुरू ठेवत 12 जणांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना 3 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आज मंगळवारी संशयित पद्माकर भागवत पाटील, शिवदास कोळी, केदार साहेबराव कोळी, शुभम दिलीप सोनवणे, सोनु तुषार कोळी, शरद पुरुषोत्तम कोळी, गंगाधर विठ्ठल पाटील, सागर अशोक कोळी, विक्की नामदेव कोळी, समाधान पुंडलिक सोनवणे, पुंडलिक तुकाराम कोळी प्रभाकर अभिमन पाटील या बाराही जणांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना न्या. एम.एम.चौधरी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्या. चौधरी यांनी या बाराही संशयितांना न्यायालयीन कोठडीत सुनावली. याप्रकरणी सरकारपक्षातर्फे अॅड. कुलकर्णी यांनी काम पाहिले.
फसवणुकप्रकरणी चौथा संशयिताला अटक
जळगाव । नोटा बदलवून देण्याचे आमिष दाखवून तिघांनी भादलीच्या एकाची 24 लाख रुपयांत फसवणूक केली होती. याप्रकरणी पोलीसांनी चौथ्या संशयिताला मंगळवारी अटक केली. संशयिताला न्या. के.एस.कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला 6 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. भादली येथील राजेश हेमराज सराफ यांची नोटा बदलून देण्याचे आमीष दाखवून 24 लाखांची फसवणूक केली होती. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी चंद्रशेखर चौधरी, चंद्रलेखा चौधरी, सुनील जंगले यांना अटक केली होती. तिघे संशयीत सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान, जिल्हा पेठ पोलीसांनी चौथा संशयित सुनिल बाळू पाटील वय-31 रा. रामानंद नगर याला अटक केली. पोलीसांनी दुपारी न्या. के.एस. कुलकर्णी यांच्या न्यायालयात संशयित सुनिल पाटील याला हजर करण्यात आले. न्या. कुलकर्णी यांनी संशयितास 6 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून त्याची कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. याप्रकरणी सरकारपक्षातर्फे अॅड. हेमंत मेंडकी यांनी काम पाहिले.