दंगली प्रकरणात निरपराध व्यक्तींना आरोपी करू नका

0

धुळे । शहरात दोन गटात उसळलेल्या दंगलीत निरपराध व्यक्तिंना आरोपी करू नका अशी मागणी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. यानिवेदनात म्हटले आहे की, बुधवारी रात्री दोन गटात दंगल उसळली, 2008 व 2013 ची पुनवृती होता होता वाचली यात काही निरपराध लोकांना यात आरोपी करण्यात आले आहे.

मुळाशी जाऊन तपासाची मागणी
सामाजिक लोक झालेला वाद मिटवत होते. त्याच्याही नाव यात गोवण्यात आले. त्यांची नावे घेऊ नये व जे खरोखर आरोपी आहेत ज्या कारणामुळे दंगल झाली त्याच्या मुळाशी जाऊन तपास करावा ,तसेच गजानन कॉलनी येथे कायम स्वरूपी पोलीस चौकी व एक सक्षम अधिकारी नेमण्यात यावा, अशी मागणी निवेदनातुन करण्यात आली आहे. निवेदन मा.आ. राजवर्धन कदमबांडे यांच्या नेर्तृत्वात देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष मनोज मोरे,स्थायी समिती सभापती कैलास चौधरी, नगरसेवक दीपक शेलार, दिनेश शार्दूल, कमलेश देवरे, सुभाष जगताप,मा.नगरसेवक राजू बोरसे, अर्षद पठाण, गड्ड्या आघाव, गणेश जाधव, रजनीश निंबाळकर, देवा केदार, मंगेश मराठे, शहर युवक अध्यक्ष कुणाल पवार, ग्रामीण अध्यक्ष रणजित राजे भोसले,महेंद्र शिरसाठ, गणेश चौधरी, आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.