नंदुरबार। मागील दोन आठवड्यापूर्वी नंदुरबार शहरात मोठी दंगल झाली होती. या दंगलीमुळे शहरातील सामाजिक स्वास्थ धोक्यात आले असून शहरात दंगल घडवून आणणार्या समाज कंटकाना अटक करावी यासह विविध मागण्यांसाठी बजरंग दल व विश्वाहिंदू परिषदेच्या पदाधिकार्यांनी पोलीस ठाण्यासमोर गुरुवारी 22 रोजी लाक्षणिक उपोषण केले. पोलीस अधीक्षकानी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
हिंदु मुलांना ताब्यात घेतल्याचा केला आरोप
10 जून रोजी नंदुरबार ला दंगल झाली होती. त्यामुळे पोलीसानी अटक सत्र सुरू केले आहे. यात दंगलीशी संबंध नसलेल्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. हिंदू मुलांना ताब्यात घेतले जात असल्याचा आरोप हिंदूवादी संघटनांनी केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ केतन रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली पोलिस ठाण्यासमोर उपोषण करण्यात आले. या उपोषणाला महिलाही बसल्या होत्या. दंगल घडवून आणणार्या खर्या आरोपींना अटक करावी, पेट्रोलपंप जाळण्याचा प्रयत्न करणार्या धर्म गुरूंना ताब्यात घेऊन चौकशी करावी, आपल्या रक्षणासाठी रस्त्यांवर उतरणार्या हिंदू तरुणांचे अटक सत्र थांबविण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. पोलिस अधीक्षक राजेंद्र डहाळे, उपअधीक्षक रमेश पवार यांनी उपोषण स्थळी भेट देऊन चर्चा केली. त्याचं प्रमाणे कारवाईचे आश्वासन दिले.