पंचकुला : बलात्कारी बाबा रामरहीमला न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर पंजाब, हरियाणात हिंसा भडकविण्याचे षडयंत्र डेरा सच्चा सौदाने रचले होते. त्यासाठी दोन जणांना 5 कोटी रूपये दिले होते, अशी माहिती एसआयटीच्या तपासात उघड झाली आहे. हनीप्रित इन्सान, आदित्य इन्सान आणि सुरेंद्र धीमन इन्सान यांनी ही रक्कम दिल्याचे उघड झाले आहे.
डेराचा पंचकुला शाखेचा प्रमुख चमकौर सिंग याच्या मार्फत ही रक्कम देण्यात आली. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर चमकौर सिंगविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेंव्हापासून तो कुटुंबीयांसह गायब आहे. हिंसेदरम्यान जीवितहानी झाल्यास भरपाई देण्याचे आश्वासनही डेराकडून भक्तांना देण्यात आले होते. चमकौरला पकडल्यावर बरीच माहिती उजेडात येणार असल्याने त्याला पकडण्यासाठी पोलिस शर्थीचे प्रयत्न करत आहेत.