जळगाव – कोरोना नियंत्रणासाठी नियमांचे उल्लंघन करणार्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या आदेशान्वये सात
जणांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा परिषद अतंर्गत ग्रामीण क्षेत्रासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, मनपा क्षेत्र अतिरीक्त आयुक्त विद्या गायकवाड, नगरपरिषद/नगरपालिका क्षेत्रा जिल्हा प्रशासन अधिकारी सतीश दिघे, पोलीस विभाग पोलीस उपअधीक्षक डी.एम. पाटील, शिक्षण विभाग शिक्षणाधिकारी बी.जे. पाटील, परिवहन विभाग मोटार वाहन निरीक्षक महेश देशमुख आणि अन्न प्रशासन विभाग सहायक आयुक्त योगेश बेंडकुळे असे नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे.