दंड भरा नाहीतर निबंध लिहा!

0

नाशिक । रस्त्यावर अपघाताचे प्रमाण पाहता नाशिक पोलिसांनी मोटर सायकलस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा यासाठी हेल्मेट वापरावर निबंध लिहा किंवा दंड भरा हा उपक्रम हाती घेतला. सक्ती न करता हेल्मेटचा वापर वाहनचालकांनी करावा. म्हणून दोन पर्याय दुचाकी चालविणार्‍या ठेवले होते. या उपक्रमामुळे ज्या वाहनचालकांनी दंड भरला आणि नंतर हेल्मेट विकत घेवून पोलिसांना दाखविले. मात्र ज्या मोटरसायकल वाहक चालकांकडे हेल्मेट नव्हते. त्यामध्ये दंड न भरता हेल्मेटचे फायदे या विषयावर निबंध लिहणार्‍याची संख्या मोठी होती. ज्या चालकांनी हेल्मेट घेतले त्यामुळे मोहिम यशस्वी झाल्याचे त्यांनी दाखविले.

1100 वाहनधारकांनी लिहला निबंध
नाशिक पोलिसांनी अचानक विना हेल्मेट चालविणार्‍या दुचाकी वाहन चालकांविरूध्द मोहीम उघडली होती. मुंबई-मायलन नाका सर्कलवर पोलिसांनी विना हेल्मेट चालविणार्‍या दुचाकी वाहन चालकांना पडकले. विना हेल्मेट चालविणार्‍या 1300 वाहनचालकांना पोलिसांनी पकडले.वाहन चालविल्यानंतर विना हेल्मेट वाहन चालविण्यासाठी 500 रूपयांचा दंड आहे. पकडण्यात आलेल्या वाहन चालकांना दंड भरा किंवा ‘हेल्मेटच्या वापराचे फायदे’या विषयावर निबंध लिहण्याचा पर्याय दिला. विना हेल्मेट वाहन चालविणार्‍या वाहन चालकांनी मोठ्या दंड न भरता त्यांनी निबंध लिहण्याचा पर्याय निवडला. यामध्ये 1100 वाहनचालकांनी निबंध लिहला.मात्र त्यांनी दंड भरला नाही किवा हेल्मेट विकत घेतले नाही.मात्र या कारवाई नंतर 12 वाहन चालकांनी दंड भरणे पसंत केले. तर या कारवाईनंतर 147 वाहनचालकांनी लागलीच हेल्मेट विकत घेवून पोलिसांना आणून दाखवले.

स्तुत्य उपक्रम
दुचाकी वाहन चालकामध्ये हेल्मेटचा वापर मोठ्या प्रमाणता व्हावा, यासाठी नाशिक पोलिसांनी केलेला हा उपक्रम स्तुत्य होता.आज जरी या उपक्रमामुळे आज जरी 147 नागरिकांनी हेल्मेट विकत घेतले असले तरी हा भविष्यात मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहन चालक हेल्मेटचा वापर करित अशी आशा पोलिसांनी व्यक्त केली.