दंत चिकित्सा शिबिर व दिव्यांग नोंदणी अभियानाचा शुभारंभ

0

तळोदा । पंडीत दिनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी वर्षानिमित् डॉक्टर्स डे चे औचित्य् साधून वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री ना.गिरीष महाजन यांचेमार्फत तळोदा तालुकयात विनामुल्य् दंत तपासणी व उपचार शिबीर दि.1 ते 3 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात सदर शिबिर उद्घाटन व दिव्यांग नोंदणी अभियानाचा देखील शुभारंभ आ. उदेसिंग पडवी यांचे हस्ते करण्यात आले.

नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तालुक्यात शिबिरे
कार्यक्रमास तहसिलदार योगेश चंद्र, भाजपा शहराध्य हेमलाल मगरे, शिबिर तालुका प्रमुख मुकेश बिरारे, सहप्रमुख कौशल,शहर प्रमुख दिपक चौधरी,शिरीष माळी, सुभाष शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. पटले, डॉ पाडवी, दंततज्ञ डॉ विणीलाल चौधरी, एस.एम.बी.टी.दन्त महाविद्यालय पथक प्रमुख डॉ सलील बापट व अभिषेक बेजवार हे उपस्थित होते. सदर दंत चिकित्सा शिबीर नंदुरबार जिल्हयातील सर्व तालुक्यात आयोजित केले असून त्यानुसार तळोदा येथे उपजिल्हा रुग्णालयात एस.एम.बी.टी. दंत महाविद्यालय, संगमनेर तसेच तज्ञ डॉक्टरांचा पथक उपस्थित झाला आहे. शिबिरा दरम्यान दातांची कवळी बसविणे, दात साफ करणे, दात काढणे, दंत कर्करोगाची तपासणी करणे आदि उपचार करण्यात येणार आहेत.शिबिराच्या पहिल्याच दिवशी 278 रुग्णांची नोंदणी झाली असून 169 रुग्णावर उपचार करण्यात आला.सदर अभियान दि.1 ते 31 जुलै दरम्यान आहे. तरी दंत चिकित्सा शिबीर व दिव्यांग नोंदणी अभियानाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन गिरीश महाजन यांनी केले आहे.