दक्षिणमुखी मारोती मंडळातर्फे नवरात्रोत्सहात जनजागृती

0

पथनाट्य, सजीव देखावा यांचा वापर

धुळे । स्वच्छ शहर सुंदर शहर,स्वच्छ भारत अभियानाच्या यशस्वीतेसाठी केंद्र व राज्य शासन विविध उपक्रम राबवुन ते यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सामाजिक उपक्रमाच्या  माध्यमातून धुळे शहरासह जिल्ह्यात स्वच्छतेचा संदेश देत जनजागृती करण्यासाठी सदैव सामाजिक उपक्रमात सहभागी होणारा धुळे शहरातील मोगलाई येथील महालेनगर परिसरातील श्री दक्षिणमुखी मारोती मित्र मंडळाने परंपरा आजही कायम ठेवत धुळे जिल्ह्यात कौतुकास पात्र ठरला आहे. आज नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. सदैव सामाजिक उपक्रम राबविणार्‍या दक्षिणमुखी मारोती मंडळातर्फे स्वच्छ भारत अभियान, बेटी बचाव बेटी पढाव, कुपोषण हटाव, हगणदारी मुक्त गाव, तंटामुक्ती अभियान,ग्रामस्वच्छता अभियान यासह विविध सामाजिक बांधिलकी जोपसणारे उपक्रम हे जनजागृतीसाठी सजीव देखाव्याच्या माध्यमातुन धुळेकरांसाठी प्रत्यक्षात साकारणार आहेत. यासाठी धुळे शहरासह बाहेरील पथनाट्य सादर करण्यासाठी कलावतांना आमंत्रीत केले आहे.

पथनाट्याच्या माध्यमातून विचार प्रबोधन
पथनाट्यच्या माध्यमातुन धुळेकर जनतेला स्वच्छ भारत मिशनबाबत प्रबोधनाच्या माध्यमातून विचारांचे प्रबोधन केले जाणार आहे. मंडळातर्फे दरवर्षी विविध विषय हाताळून सामाजिक कार्य करण्यास मंडळ सदैव अग्रेसर राहते.आपल्या कार्याच्या माध्यमातून केवळ शहरातच नव्हे तर संपूर्ण धुळे जिल्ह्यात नाव लौकिक मिळविणारे श्री दक्षिणमुखी मारोती मंडळ हे खरोखर कौतुकास्पद आहे. नवरात्रोउत्सवानिमित्त देवीची आकर्षक भव्य मुर्तीची प्रतिष्ठापणा केली आहे.विविध क्षेत्रातील मान्यवर दरवर्षी मंडळाच्या उपक्रमास भेट देवून सदिच्छा देतात. आकर्षक विद्युत रोषणाईने मंडळातर्फे सजावट करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कायदा सुव्यवस्था अबाधीत रहावी,कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते नेहमीच सजग राहुन त्यांनी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वीत केले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे सर्व पदाधिकारी,सन्मानिय नागरीक परिश्रम घेत आहेत.