दक्षिण आफ्रिकेत शाहरूखचा केपटाऊन नाइट रायडर्स

0

केपटाऊन । आयपीएल मधील केकेआरचा मालक असलेला बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान आता भारत देशाबाहेर टि -20 मध्ये संघ विकत घेतला आहे. त्याचे खेळा विषयी असलेले प्रेम सर्वांना माहित आहे.त्यामुळेच त्याने चॅम्पियन ट्रॉफीच्या अतिम सामन्यात समालोनच देखिल केले.आयपीएलमधील दिल्ली डेअरडेविल्स संघाचा मालक असलेला जीएमआर ग्रुप आणि शाहरुख खान यांनी ’क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या (सीएसए)’ 8 संघांच्या टी-20 ग्लोबल लीगमध्ये फ्रेंचायजी घेतली आहे.

नाइट रायडर्स ब्रॅण्ड जगभरात न्यायचा आहे
केआरआरचा शाहरुख खानची खेळाविषयीची आवड आपण पाहतोच आहोत.शाहरुखने आता दक्षिण आफ्रिकेतही एक क्रिकेट संघ विकत घेतला आहे. कोलकाता नाइट रायडर्स आणि त्रिनबागो नाइट रायडर्सचा सहमालक असलेला शाहरुख त्याच्या या नव्या केपटाऊन नाइट रायडर्स या नव्या संघासाठीदेखील उत्साही आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकाला या नव्या टी-20 ग्लोबल लीगसाठी त्याने कोलकाता नाइट रायडर्सच्या वतीने शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या नाइट रायडर्स ब्रॅण्डला या लीगमध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल आभारही व्यक्त केले आहेत. नाइट रायडर्स हा ब्रॅण्ड जगभरात लोकप्रिय बनविण्यासाठीचा एक भाग म्हणून टी-20 ग्लोबल लीगमध्ये संघ विकत घेतल्याचे केआरआरचे व्यवस्थापकीय संचालक वँकी मैसूर यांनी सांगितले.

नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये सीएसएच्या ग्लोबल लीगचे आयोजन होणार आहे.खेळाडूंची नावे ऑगस्टमध्ये ठरणार आहेत. मात्र या लीगमध्ये खेळण्यासाठी आतापर्यंत 10 देशांमधील साधारण 400 खेळाडूंनी पसंती दर्शविली आहे. जेपी डुमिनी हा डावखुरा फलंदाज शाहरुखच्या संघातील स्टार असणार आहे. तर जोहान्सबर्ग हे जीएमआरच्या संघाचे तळ असून दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा मार्कि हा युवा खेळाडू या संघातून खेळणार असल्याची चर्चा आहे.