दक्षिण काशी प्रकाशा येथून ‘जलकलश’ यात्रेला सुरुवात

0

चाळीसगाव- बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या पोहरागड, ता.मानोरा जि.वाशीम येथे संत सेवालाल महाराजांच्या समाधीस्थळी नंगारा आकाराची वास्तु तयार होणार आहे. या वास्तुच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी दक्षिण काशी प्रकाशा येथील तापी नदीचे जल घेऊन जाणार असल्याची माहिती स्टार फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.तुषार राठोड यांनी दिली. नंदुरबार येथील दंडपाणेश्वर मंदिरावर बुधवारी सर्वपक्षीय समाजबांधवांची बैठक घेण्यात आली होती त्यावेळी डॉ.तुषार राठोड व श्रावण चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. सेवालाल महाराजांच्या समाधीस्थळी कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे, अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार, परीरवहन मंत्री दिवाकर रावते, दादा भूसे, महसुलमंत्री संजय राठोड आदींची उपस्थिती राहणार आहे. यानिमित्त प्रकाशा येथील तापी नदीतील जल भूमिपुजनावेळी अर्पण करण्यात असल्याने समारंभकपूर्वक हे जल घेऊन मार्गस्थ होणार आहेत. यावेळी डॉ.तुषार राठोड, श्रावण चव्हाण, रोहिदास राठोड, बंधुलाल राठोड, रघुनाथ जाधव, केशरसिंग नायक, धनंजय राठोड, नरेंद्र राठोड, डी.नानु.राठोड, धर्मा राठोड, शिवाजी चव्हाण, कृष्णा राठोड, डॉ.साईदास चव्हाण आदी उपस्थित होते.