गोल्ड कोस्ट । दक्षिण कोरियाने चीनचा 3-2 अशा फरकाने पराभव करून 14 वर्षानंतर पहिल्यांदा सुदिरमन बॅडमिंटन चषकावर आपले नाव कोरले. चीनने बॅडमिंटन क्षेत्रात आपले वर्चस्व राखताना दहा वेळा सुदीरमन चषक पटकाविला होता. विश्व संमिश्र सांघिक स्पर्धेत दक्षिण कोरियाचे हे चौथे विजेतेपद आहे. निर्णायक मिश्र दुहेरी लढतीत चोई सोल ग्यू आणि चेई यू जुंग याने 21-17, 21-13 असा विजय मिळवत संघाच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
प्रत्येक दोन वर्षांत होणार्या या स्पर्धेत 2003 नंतर कोरियाचे हे पहिले विजेतेपद आहे आणि त्याचबरोबर चीनचे 14 वर्षांच्या वर्चस्वालादेखील तडा बसला आहे. 1991 आणि 1993 मध्येदेखील सुदिरमन चषकात विजेतेपद पटकावणारा दक्षिण कोरियाचा संघ एक वेळ 1-2 ने पिछाडीवर होता; परंतु अखेरच्या दोन लढती त्यांनी जिंकताना ही स्पर्धा 3-2 फरकाने जिंकली. मिश्र दुहेरीच्या सामन्यात दक्षिण कोरियाच्या चौई सॉल गेयु आणि चेई यु जंग या जोडीने 21-17, 21-13 असा चीनच्या जोडीचा पराभव करून आपल्या संघाला सुदीरमन बॅडमिंटन चषक मिळवून दिला. प्रत्येक दोन वर्षांनी होणार्या या प्रतिष्ठेच्या बॅडमिंटन स्पर्धेत दक्षिण कोरियाने इंडोव्हेन येथे 2003 साली यापूर्वी सुदीरमन चषक पटकाविला होता. त्याचप्रमाणे 1991 आणि 1993 साली दक्षिण कोरियाने या स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते.