शेंदुर्णी । पाचोरा तालुक्यातील कळमसरा येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेला दक्षिण कोरिया देशातील सेटनेट स्कुलच्या नऊ सहकार्यांनी भेट दिली. दक्षिण कोरीयातील हा संघाने शैक्षणिक व शांततेच्या प्रसारासाठी भेट दिली. लोकल कोआर्डीनेटर, सॅनगॅइवाँग पार्क (प्रिंसीपल), साशा पार्क, मिसीक ली (प्रोग्राम मॅनेजर), जीयाँग जॅग, जेऊन हॅन, हिईऑन पार्क, वॉमही जॅग आणि अमिता जॉन चेल्लदुरई या समुहाने शाळेला भेट दिली. त्यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत वेळ घालवून आनंद साजरा केला. कन्या शाळेचे मुख्याध्यापक विजय देवरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. शिक्षक राकेश धायबर, राहुल महाजन, दिपक ढोणी आदींनी टिम साऊथ कोरीयाचा सत्कार केला. गावातील प्रतिष्ठित नागरीकांसह परिसरातील नागरिकांची यावेळी उपस्थिती होती. विद्यार्थ्यांमध्ये एकात्मतेची भावना निर्माण करणे तसेच आपल्या देशात नाट्य, संगीत, शिक्षण, प्रेम या क्षेत्रात काम करून संस्था त्यांचा पुनर्विकास करण्याचा ÷उद्दिष्ट या पाहूण्याचा आहे.