मुंबई । अयप्पा पी आरने केलेले दोन गोल हे दक्षिणमध्ये रेल्वेने नौदलावर मिळवलेल्या 3-1 अशा विजयाचे वैशिष्ट्य ठरले. मुंबई हॉकी असोसिएशन लिमिटेड आयोजित या स्पर्धेतील रेल्वेचचा तिसरा गोल राजू पालने केला, तर पराभूत नोदलाकडून जुगराज सिंगने एकमेव गोल केला.
भारतीय नौदलाच्या खेळाडूंनी सामन्यात सकारात्मक सुरुवात केली होती. जुगराजने पेनल्टी कॉर्नरवर आठव्या मिनिटालाच गोल करून नौदलाला चांगली सुरुवातही करुन दिली होती. या गोलनंतर दोन्ही संघानी आक्रमक खेळ करत सामन्यातील रंगत वाढवली. या प्रयत्नात अयप्पाने 25 मिनिटांना पहिला गोल करत संघाला सामन्यात बरोबरी साधून दिली. या बरोबरीनंतर राजू पालने 40 व्या मिनिटला गोलकरुन रेल्वेला आघाडीवर नेले. त्यानंतर सामन्यातील शेवटच्या मिनीटांमध्ये अयप्पाने दुसरा गोल करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.त्याआधी झालेल्या अन्य लढतीत बंगळुरूच्या आर्मी एकादश संघाने एमएचएएल एकादश संघाचा 3-1 असा पराभव केला. आर्मी एकादश संघाने आक्रमक सुरुवात करताना पहिल्या सत्रात 1-0 अशी आघाडी मिळवली होती. विनय भेंग्रा (33 वे मिनिट), सुधाकर टी बी ( 45 वे मिनिट ) आणि चंदन ऐंद (69 वे मिनीट) गोल करत संघाला विजयी केले.