पिंपरी : तळवडे गावातील स्मशानभूमीजवळ अज्ञात २५ ते ३० वर्षीय तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली आहे. आज सकाळी त्याचा मृतदेह आढळला आहे. याबात नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही.
देहूरोड पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या तळवडे येथील स्मशानभूमीजवळ मृतदेह असल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. देहूरोड पोलिसांच्या हद्दीतील तीन दिवसातील ही दुसरी घटना आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.