दगडीच्या अल्पवयीन तरुणीला पळवले ; दोघांविरुद्ध गुन्हा

0

यावल- तालुक्यातील दगडी येथील अल्पवयीन तरुणीला पळवून नेल्याप्रकरणी गावातील दोघांविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. गावातीलच 16 वर्षीय तरुणीला संशयीत आरोपी किशोर वसंत गायकवाड व अनिल उर्फ कालू रमेश भील यांनी 13 मे रोजी दुपारी 12.30 पालकांच्या कायदेशीर रखवालीतून पळवून नेल्याचा आरोप आहे. तपास हवालदार नेताजी वंजारी करीत आहेत.