पुणे । श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती उत्सवास 125 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून प्रसिद्ध रंगावलीकांर प्रा. अक्षय शहापूरकर यांनी दगडूशेठ हलवाई गणपतीची थ्रीडी रांगोळी साकारली आहे. या प्रदर्शनातील ही रांगोळी भाविकांचे आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
या रांगोळीस सलग 16 तास लागले असून, त्यास विशिष्ट पद्धतीचे रेखांकन आवश्यक असते. जर रेखांकन थ्रीडी नसेल, तर पुढे अशी थ्रीडी रांगोळी साकारणे शक्य नाही. पुढे अशा प्रकारच्या थ्रीडी रांगोळीस अधिक मागणी प्रेक्षकांकडून होणार आहे. तरी त्यासाठी कार्यशाळा घेऊन अधिक विद्यार्थी घडवणार असल्याचेही अक्षय शहापूरकर यांनी सांगितले. रांगोळी म्हटले की, फक्त पारंपरिक रांगोळी, व्यक्तिचित्र रांगोळी यापुरता मर्यादित न राहता, त्याही पलीकडे अजून बरेच प्रकार त्यांनी कलाप्रेमींसाठी साकारण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे.