‘दगडूशेठ’च्या दर्शनासाठी गर्दी

0

पुणे । श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये गणपती बाप्पांना 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. पुण्यातील आंब्यांचे व्यापारी देसाई बंधु आंबेवाले यांच्यावतीने हा नैवेद्य देण्यात आला. तसेच साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षयतृतीयेनिमित्त गणेशाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची पहाटेपासूनच येथे गर्दी केली होती.

यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने यांसह विश्‍वस्त आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी महेश सुर्यवंशी म्हणाले, दरवर्षी अक्षयतृतीया सणाचे औचित्य साधत गणरायाच्या चरणी आंब्याची आरास असते. या सणाच्या दुसर्‍या दिवशी आंब्याचा प्रसाद ससूनमधील रुग्णांना, खडकी येथील अपंग सैनिक पुर्नवसन केंद्रातील जवानांना, कोंढवा येथील बालसंगोपन केंद्रातील मुले, वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना आणि उद्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना प्रसाद म्हणून देण्यात येणार आहे.