पुणे । नवसाला पावणारा गणपती अशी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची ख्याती आहे. गणेशोत्सवात दगडूशेठचे दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करतात. त्याचप्रमाणे मनोभावे दानदेखिल करतात. गणेशोत्सवात दगडूशेठ हलवाई बाप्पाच्या दानपेटीत साडेतीन कोटींचे दान भाविकांनी केले आहे. लालबागच्या राजानंतर दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दानपेटीतही भक्तांनी जुन्या 500-1000 च्या नोटा टाकल्याचे आढळून आले आहे. यामध्ये 25 हजार रुपयांच्या जुन्या नोटा आढळल्याची माहिती श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी दिली.