दगडूशेठ गणपतीला १२६ किलोचा मोदक

0

पुणे-लाडक्या बाप्पाचे वाजत-गाजत काल आगमन झाल्यानंतर सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. गणरायाला विविध पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. पुण्याचा अधिपती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला तब्बल 126 किलो वजनाच्या मोदकाचा नैवेद्य दाखवण्यात आला. एका भक्ताने आपल्या लाडक्या दैवतासाठी ही अनोखी भेट दिली आहे.

सुकामेव्यापासून बनवण्यात आलेल्या या मोदकाला चांदीचा वर्ख चढवण्यात आला आहे. यंदा मंडळाने 126 वर्ष पूर्ण केली असल्याने 126 किलोंचा मोदक तयार करण्यात आला आहे. काका हलवाई यांनी हा मोदक बनवला आहे. एका भक्ताने त्याचा नवस पूर्ण झाल्यामुळे हा मोदक अर्पण केला आहे. बाप्पाला नैवेद्य दाखवल्यानंतर हा मोदक प्रसाद म्हणून वाटण्यात येणार आहे.