दगडूशेठ गणपती चरणी १५१ किलोचा मोदक !

0

पुणे: गणेशोत्सवाचा पर्व सुरु झाला आहे. काल सर्वत्र श्री चे आगमन झाले आहे. राज्यभरात पुण्यातील दगडूशेठ हलवाईच्या गणपतीची चर्चा अधिक असते. यावेळी दगडूशेठ गणपती चरणी १५१ किलोचा मोदक चढविण्यात आले आहे. कालपासून गणेश भक्तांची गर्दी पुण्यात वाढली आहे. दगडूसेठ हलवाईच्या गणपतीच्या दर्शनासाठी राज्यभरातून भक्त पुण्यात दाखल झाले आहे.

ज्याची किर्ती संपूर्ण जगात पोहोचली आहे असा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे आगमन होऊन काही तास उलटले आहेत. मंगळवारी सकाळी वडगाव मावळ येथील जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर यांनी १५१ किलोचा मोदक श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी अर्पण केला आहे.