दगडूशेठ गणपती दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी

0
पुणे : चालू कँल़ेडर वर्षातील शेवटची अंगारकी चतुर्थी आज असल्याने येथील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
मंदिरात रात्री बारा वाजल्यापासूनच भाविकांची गर्दी व्हायला सुरुवात झाली. संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरणाने फुलून गेला होता. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने मंदिरात फुलांची आरास करण्यात आली. झेंडू, शेवंती, गुलाब अशी सहा हजार फुलं यासाठी वापरली. मनोवेधक आरासीलाही भाविकांनी दाद दिली. प्रसिद्ध गायिका अनुराधा कुबेर यांनी ‘गुणकाला’ राग सादर करुन स्वराभिषेक केला.