पुणे : दगडूशेठ गणपती मंदिर पुण्यातील प्रसिद्ध, लोकांच्या श्रध्देचे आणि भक्तीचे प्रमुख स्थान आहे. हे गणपती मंदिर भक्तांचे एक श्रद्धाकेंद्र आहे. मंदिरात महागणपतीचे सानिध्य जाणवते. इथे येऊन दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन मन प्रसन्न झाले, असे परमपूज्य श्रृंगेरी जगद्गुरु श्रीशंकराचार्य श्रीविधुशेखरभारती स्वामीमहाराज यांनी सांगितले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी परमपूज्य श्रृंगेरी जगद्गुरु श्रीशंकराचार्य श्रीविधुशेखरभारती स्वामीमहाराज मंदिरात आले होते. यावेळी दगडूशेठ गणपती ट्रस्ट तर्फे बँडच्या सुरावटी व फुलांच्या पायघडयांनी त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच परमपूज्य श्रृंगेरी जगद्गुरु श्रीशंकराचार्य श्रीविधुशेखरभारती स्वामीमहाराज यांनी गणपतीची पूजा, आरतीदेखील केली. देवाचे अस्तीत्व दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये प्रखरतेने जाणवते, असे त्यांनी सांगितले. पंडित वसंतराव गाडगीळ, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सुर्यवंशी, उल्हास भट, राजाभाऊ घोडके, बाळासाहेब सातपुते, अक्षय गोडसे, मंगेश सुर्यवंशी याप्रसंगी उपस्थित होते.