दगाबाज मित्राचा घरात घुसून विवाहितेवर बलात्कार

0

कल्याण । विवाहितेचा पती जेलमध्ये असल्याची संधी साधत घरात घुसून पतीच्या दगाबाज मित्रानेच महिलेवर बलात्कार केल्याची घटना कल्याणात उघडकीस आली आहे. या नराधम मित्राने पतीला जेलमधून निर्दोष मुक्त करण्याचे आमिष दाखवत पीडितेकडून 5 लाख रुपये घेऊन आर्थिक फसवणूक केली आहे.

सूर्यकांत शिंदे असे त्या नराधमाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेने खडकपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत, तक्रार दाखल केली असून या पोलिसांनी पतीचा नराधम मित्र सुर्यकांतविरोधात बलात्कारासह व जीवे ठार मारण्याची धमकी व आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. विशेष म्हणजे नराधम सूर्यकांत हा एका शाळेचा संचालक असल्याची माहिती समोर आली आहे.