ध्वनिप्रदूषणाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
मुंबई : अनंत चतुर्दशीनिमित्त होणारे गणपती विसर्जन मिरवणुकांचे लाऊडस्पीकर आता शांतता क्षेत्रातही वाजणार आहेत. ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने निर्धारित केलेल्या निर्बंधाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे गणपती विसर्जनादरम्यान सध्याच्या काही शांतता क्षेत्रातही लाऊडस्पीकर वाजवण्याची मुभा मिळाली आहे. ध्वनीप्रदूषणाबाबत केंद्राच्या नव्या नियमांना उच्च न्यायालयाने चाप लावला होता. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे मुंबईतील जवळपास 80 टक्के भाग सायलेन्स झोन घोषित झाला असून, त्यामुळे गणपती विसर्जन आणि नवरात्रासारख्या उत्सवांच्या आयोजनात अडचणी येत असल्याचा दावा सरकारने सर्वोच्च न्यायालयात केला होता.
या रस्त्यावर असेल नो एण्ट्री!
* जंगली महाराज रोड
* शिवाजी रोड
हे देखील वाचा
* मुदलियार रोड
* नेहरू रोड
* सोलापूर रोड
* बाजीराव रोड
* सातारा रोड
* शास्त्री रोड
* कर्वे रोड (नळ स्टॉपसमोर)
* फर्ग्युसन कॉलेज रोड