कांदा, बटाटा, लसूण, टोमॅटो, पापडी, डिंगरी, ढोबळी मिरची, बीट, मटार आणि सुरणच्या भावात 10 ते 20 टक्क्यांनी घट
पुणे ।मार्केट यार्डात फळभाज्याची आवक वाढली आहे. त्यामुळे कांदा, बटाटा, लसूण, टोमॅटो, पापडी, डिंगरी, ढोबळी मिरची, बीट, मटार आणि सुरणच्या भावात 10 ते 20 टक्क्यांनी घट झाली आहे. मागणी वाढल्यामुळे आले, दोडका, काकडी, वांगी, नवलकोल, तोंडली आणि घेवड्याच्या भावात गेल्या आठवड्याच्या तुलनेत सुमारे 20 टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.
श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील भाजीपाला विभागात रविवारी सुमारे 225 ट्रक शेतमालाची आवक झाली. परराज्यातून बेंगलोर येथून 4 ते 5 टेम्पो आले, मध्यप्रदेश मधून 20 ट्रक मटार, कर्नाटक आणि गुजरात येथून 4 ते 5 ट्रक कोबी, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि गुजरात येथून 15 ते 16 टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून 2 ते 3 टेम्पो शेवगा, राजस्थान येथून 7 ते 8 ट्रक गाजर, मध्यप्रदेश आणि गुजरात मधून लसणाची अडीच हजार गोणी इतकी आवक झाली. स्थानिक भागातून सातारी आल्याची 1300 ते 1400, टॉमेटोची साडेपाच ते सहा पाच हजार पेटी, फ्लॉवरची 18 ते 20 टेम्पो, कोबीची 16 ते 18 टेम्पो, ढोबळी मिरचीची 14 ते 15 टेम्पो, भुईमूग शेंगची 25 पोती, पावटा 10 ते 12 टेम्पो, वांगी 8 ते 10 टेम्पो, तांबडा भोपळाची 10 ते 12 टेम्पो, गवारची 5 ते 6 टेम्पो, भेंडीची 8 ते 10 टेम्पो, नवीन कांद्याची 175 ट्रक, जुन्या कांद्याची 20 ते 25 टेम्पो, आग्रा, इंदौर आणि गुजरात येथून मिळून बटाट्याची 60 ट्रक इतकी आवक झाली.
फळभाज्यांचे दहा किलोचे भाव
कांदा : नवा : 200-300, जुना : 350-400, बटाटा : 60-80, लसूण : 150-400, आले : सातारी : 180-220, बेंगलोर : 240-260, भेंडी : 200-250, गवार : गावरान व सुरती 300-400, टोमॅटो : 280-320, दोडका : 250-350, हिरवी मिरची : 200-250, दुधी भोपळा : 80-120, चवळी : 180-220, काकडी : 100-140, कारली : हिरवी 280-300, पांढरी : 180-200, पापडी : 250-270, पडवळ : 200-220, फ्लॉवर : 40-60, कोबी : 140-200, वांगी : 100-200, डिंगरी : 160-180, नवलकोल : 140-160, ढोबळी मिरची :200-220, तोंडली : कळी 280-300, जाड : 100-110, शेवगा : 1100-1200, गाजर : 250-320, वालवर : 180-320, बीट : 160-180, घेवडा : 450-500, कोहळा : 100-150, आर्वी : 200-250, घोसावळे : 140-150, ढेमसे : 180-200, पावटा : 200-250, भुईमुग शेंग : 350, मटार : 300-360, पावटा : 200-250, तांबडा भोपळा : 80-120, सुरण : 200-280, मका कणीस : 50-80, नारळ (शेकडा) : 1000-1600.
थंडीच्या कडाक्याने फळांची मागणी घटली
थंडीचा जोर वाढत चालल्यामुळे कलिंगड, खरबूज, बोरांसह विविध फळांना मागणी घटली आहे. मात्र, सफरचंद व पेरूची मागणीच्या तुलनेत आवक घटल्याने दरात 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर ढगाळ वातावरणामुळे बाजारात बोरांची आवक वाढली आहे. लिंबाला घटलेली मागणी कायम असून दर स्थिर आहेत. सध्यस्थितीत लोणचे उत्पादकांकडून लिंबाला मागणी होत असल्याचे व्यापार्यांनी सांगितले. रविवारी येथील फळबाजारात अननस 05 ट्रक, मोसंबी 65 ते 70 टन, संत्री 5 टन, डाळिंब 100 टन, पपई 20 ते 25 टेम्पोे, लिंबाची 7 ते 8 हजार गोणी, चिक्कू 02 हजार बॉक्स, पेरु 1500 क्रेटस्, कलिंगड 15 ते 20 टेम्पो, खरबुज 10 ते 12 टेम्पो, सफरचंद 08 ते 10 हजार पेटी, बोरे 4 हजार गोणी, द्राक्षे 2 ते 2.5 टन, स्ट्रॉबेरी दिड टन, सिताफळ 3 ते 3.5 टन इतकी आवक झाल्याचे व्यापार्यांनी सांगितले.
पालेभाज्यांचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्यात
पालेभाज्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे सर्व पालेभाज्यांच्या भावात घसरण झाली असून, भाव सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. कांदापात आणि करडईच्या भावात गेल्या आठवड्याच्या तुलनेत शेकडा जुडीमागे प्रत्येकी 400 रुपये, तर चवळईच्या भावात 300 रुपये, कोथिंबीर आणि हरभरा गड्डीच्या भावात प्रत्येकी 200 रुपयांनी घट झाली आहे. घाऊक बाजारात कोथिंबीर आणि मेथीच्या जुडीला 2 ते 4 रुपये मोजावे लागत आहेत. तर किरकोळ बाजारात 10 रुपये भावाने जुडीची विक्री होत आहे. रविवारी मार्केटयार्डातील तरकारी विभागात कोथिंबीरीची 2 लाख 25 हजार जुडी, तर मेथीची एक लाख 75 हजार जुडींची आवक झाली. आवक घटल्याने केवळ चवळईच्या भावात मात्र शेकडा जुडीमागे घाऊक बाजारात 300 रुपयांनी वाढ झाली आहे. उर्वरित पालेभाज्यांचे उतरलेले भाव कायम आहेत. पुढील काही दिवस ही परिस्थिती कायम राहिल, असा अंदाज व्यापारी विलास भुजबळ यांनी वर्तविला आहे.
पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी)
कोथिंबीर : 200-400, मेथी : 200-400, शेपू : 500-800, कांदापात : 500-1000, चाकवत : 500-600, करडई : 400-500, पुदिना : 400-500, अंबाडी : 500-600, मुळे : 800-1200, राजगिरा : 500-600, चुका : 500-700, चवळई : 500-700, पालक : 500-600, हरभरा गड्डी : 500-1000
फळांचे दर पुढीलप्रमाणे
लिंबे (प्रति गोणी) : 30-80, अननस (डझन) : 70-270, मोसंबी : (3 डझन) : 130-350, (4 डझन ) : 80-220, संत्रा : (3 डझन) 150-250, (4 डझन) : 100-150, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : 15-60, गणेश 05-15, आरक्ता 10-25. कलिंगड : 05-10, खरबुज : 10-25, पपई : 05-20, चिक्कू : 100-500, पेरू (20 किलो) : 400-600, सीताफळ : 15-100. सफरचंद : सिमला (20 ते 25 किलो) : 1100-1500, काश्मीर डेलीशियस (15 किलो) 600-1300, किन्नोर : (25 किलो) 1600-2200, अमेरिकन डेलीशियस : (15 किलो) 1000-1200, महाराजा ( 15 किलो) : 450-700. बोरे : चेकनट (10 किलो) 300-350, चण्यामण्या : 220-250, चमेली : 80-90, उमराण : 50-60, द्राक्षे : तासगणेश (15 किलो) 700-1100, जम्बो ( 10 किलो) : 900-1100, स्ट्रॉबेरी 150-250.
फुलांचे दर वाढले
दत्त जयंतीमुळे झेंडुच्या फुलांचे दर वाढले, तसेच जर्बेरा, कार्नेशियन, गुलाब, गुलछडी आदी फुलांच्या दरात लग्नसराईमुळे 10 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दिल्ली हैद्राबाद येथुन गुलछडीला मागणी वाढली आहे. दरम्यान, मार्गशीर्ष महिन्यामुळे इतर फुलांनाही चांगली मागणी असून जिल्ह्याच्या विविध भागातून फुलांची आवक चांगली होत असल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत दर साधारण दहा ते 20 टक्के वाधले आहेत असल्याची माहिती फुलांच्या व्यापा-यांनी दिली.
फुलांचे प्रति किलोचे दर पुढीलप्रमाणे
झेंडू : 30-40, गुलछडी : 140-160, बिजली : 80-100, कापरी : 40-50, सुट्टा कागडा : 300-400, शेवंती : 50-60, ऑस्टर : 10-12, गुलाबगड्डी (गड्डीचे भाव) : 30-40, ग्लॅडिएटर : 30-40, गुलछडी काडी : 50-60, डच गुलाब (20 नग) : 1400-180, लिलिबंडल : 12-15, जर्बेरा : 70-80, कार्नेशियन : 200-250.