जळगाव। मेहरुण परिसरातील तरुणाची गळा चिरुन हत्या झाल्याची धक्कादायक घटना सकाळी उघडकीस आली. शिरसोली आकाशवाणी प्रसारण केंद्राजवळील जंगलात त्याचा मृतदेह आढळला. दत्तनगरमधील नावीद शफीकउद्दीन पिरजादे (वय18) या तरुणाचा मृतदेह जंगलात आढळला. गळा चिरलेला तसेच कमरेच्यावर दोन ठिकाण वार करुन त्याची हत्या झाल्याचा अंदाज पोलिसांनी लावला.
रोजा सोडल्यानंतर बेपत्ता
नावीद बी.जे.मार्केटमध्ये जातो असे सांगून घराबाहेर पडला. सायंकाळी रोजा सोडल्यानंतर त्याने तरावी पठण केले. फातेमा मशीदीत नमाज पठण केले. 9.30 वाजेच्या सुमारास नावीद बेपत्ता झाला. रात्रभर मुलाच्या मोबाईल फोन बंद येत असल्याने कुटूंबीयांनी रात्र काळजीतच काढली.
दुपारी ओळख पटली : जिल्हा रुग्णालयात दुपारी 12.27 वाजता मृतदेह सय्यदअली जावेद, शकील खान, समीर हमीफ खाटीक यांनी ओळखले. त्यांच्या सांगण्यावरुन नावीद यांच्या घरच्यांना बोलविण्यात आले. वडील शफीकउद्दीन पिरजादे यांनी मृतदेह पाहताच आक्रोश केला. सोरटच्या दुकानावर होता कामाला बी.जे.मार्केटमध्ये शरीफ खान मोहम्मद खान यांच्या सोरटच्या दुकानावर तो गेल्या दोन वर्षापासुन कामाला होता. तसेच जाकीर भाई, पिंटु भाई, कैलास राजपूत यांच्याकडेही भंगाराच्या दुकानावर कामाला असल्याची माहिती समोर येत आहे.
रुग्णालयात आक्रोश
नावीद याला तीन भाऊ व चार बहिणी आणि आई-वडील असा परिवार आहे. वडील शफीकउद्दोनीन जमीजउद्दोनीन पिरजादे, आई शरीबाबानो, भाऊ जियाउल्लक, नजीमउल्लक, जुनेद, बहीण शबानापरवीना, शबीना परवीना, शायना परवीना, शबनम परवीना असा परिवार आहे. नातेवाईकांनी जल्हिा रुग्णालयात एकच आक्रोश केला होता. मेहरुण परिसरातील तरुणाचा खून झाल्याची वार्ता कळताच परिसातील अनेकांनी रुग्णालयात गर्दी केली. काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी डीवायएसपी सचिन सांगळे, पोनि.सुनिल कुराळे, पोनि. सुनिल गायकवाड यांच्यासह अधिकारी व कर्मचार्यांचा बंदोबस्त होता.