पुणे । नारळी पौर्णिमेनिमित्त बुधवार पेठेतील कै.लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात तब्बल 2100 शहाळ्यांच्या नारळांची आकर्षक आरास करून मंदिरात दोन दिवसीय कल्पवृक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मंदिराच्या कळसापर्यंत नारळाची झाडे, मुख्य गाभार्यासह प्रवेशद्वारावर आकर्षक फुले व पानांची आरास करण्यात आली होती. यावेळी अंकुश काकडे, अॅड.शिवराज कदम जहागिरदार, बाळासाहेब गायकवाड, शिरीष मोहिते, चंद्रशेखर हलवाई, अॅड.एन.डी.पाटील, युवराज गाडवे, उल्हास कदम, नंदकुमार सुतार यांसह कर्मचारी उपस्थित होते. भाविकांनी ही आरास पाहण्यासाठी गर्दी केली. सरपाले बंधू यांनी ही आरास केली आहे.