दत्तवायपुर येथे महानभुव पंथाचा चावदस तिथीला भाविकांची गर्दी

0

शिंदखेडा। शिंदखेडा तालुक्यातील दत्तवायपुर येथे महानभुव पंथाचा चावदस तिथीला (पौर्णिमाच्या आदल्या दिवशी) दत्तमंदिरात व श्री कृष्ण मंदीरात पविते. पर्व उत्सवात साजरा करण्यात आले. दत्तभाविक नारळाला या पर्वच्या अगोदर सुताच्या धागाने गुंफून व फळे असे या दिवशी आलेल्या सर्व भाविकांची स्पर्श करून दत्त महाराज व श्रीकृष्ण मुर्तीला अपर्ण करतात. असे सुताचे नारळ व फळं आदी आलेले भरचेश भाविक मनोकामना पूर्ण करण्यासाठी अपर्ण करतात. महानभुव पंथाचे पविते पर्वची सुरूवात बीड शहरातील चक्रधर स्वामींचे भ्रमण कालावधीत आगमन झाले तेव्हां या दिवशी स्वामींच्या स्वागतासाठी भाविकांनी सुताचे नारळ व फळे आदी दिल्याने त्यांना चक्रधर स्वामी त्याची महती सांगुन प्रचती देऊ लागले. तेव्हापासून या पंथामधील भाविक हा उत्सव साजरा करित असतात. सदर उत्सव दत्तवायपुर येथील मंदिरात व परिसरातील या पंथातील भाविकाचे घरी चक्रधर स्वामींचे विशेष व श्रीकृष्ण मुर्ती असल्याने तर घरोघरी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

यशस्वितेसाठी यांनी घेतले परीश्रम
या पविते पर्वाच्या कार्यक्रमाला परिसरातील भाविकांची मोठी गर्दी होती. यावेळी ट्रस्ट अध्यक्ष आर पी.पाटील, पुजारी ललित तळेगावकर, सरवेचे माजी उपसरपंच मंगलदास भामरे, नारायणशेठ पाटील, योगेंद्र पाटील, अंबादास पाटील, दत्तात्रय पाटील, गोपाल पाटील, अ‍ॅड.राजेश पाटील, शत्रुघ्न पाटील, गुलाब पाटील, साहेबराव पाटील, तुकाराम पाटील, महेंद्र पाटील, राकेश पवार, निलेश पाटील, यशवंत पाटील, विजय माळी, नाना पाटील, आनंदा माळी, संदीप माळी आदी भाविकांनी उपस्थिती दाखवून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.