जिल्हा पोलीस दलातर्फे निरोप समारंभ
नूतन पोलीस अधीक्षकांचा स्वागत समारंभ
जळगाव : स्वतः मोबाईल नंबर जारी केल्याने अनेक खबरे झाले. त्यांच्याकडून माहिती मिळाल्याने शेकडो वाळूची वाहने पकडली. सट्टा, मटका, जुगार बंद केला. जिल्हाभरात अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. गैरकामात सहभागी असणार्या अधिकारी, कर्मचार्यांच्या बदल्या केल्या. त्यामुळे माझ्या बदलीचा सर्वाधिक आनंद अवैधधंदे व्यावसायिकांसह त्यांना पाठीशी घालणार्या अधिकार्यांना झाला, असे मत जळगाव जिल्ह्याचे मावळते पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे यांनी व्यक्त केले.
जिल्हा पोलिस दलातर्फे आज सायंकाळी पाच वाजता मंगलम हॉलमध्ये मावळते पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांना निरोप व नूतन पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले यांचे स्वागत कार्यक्रम पार पडला. यावेळी दत्ता शिंदे बोलत होते. व्यासपीठावर अप्पर पोलिस अधीक्षक लोहीत मतानी उपस्थित होते. याप्रसंगी राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष गफ्फार मलिक, अप्पर पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांनीही मनोगत व्यक्त केले. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक बापू रोहन यांनी आभार मानले.
शिस्त पोलीस दलाची ताकद, शिस्तीने वागा
शिंदे म्हणाले, की जिल्ह्यात मला फक्त सात महिन्याचा कार्यकाळ मिळाला. 3 ऑगस्टला 2018 पदभार घेतला अन ऍक्शनवर भर दिला. जे बोललो ते करून दाखविले. कायदा सुव्यवस्था व जनहिताच्या कल्याणासाठी माझे अधिकार वापरले. अंतर्गत बदल्या केल्या. यामुळे कुणी दुखावले असेल पण तो कामाचा भाग होता. शिस्त पोलिस दलाची ताकद आहे. यापुढेही शिस्तीने वागा. शिस्तीच्या जोरावर भुसावळमधील 50 वर्षांपासून रखडलेले अतिक्रमण काढू शकलो. जळगावातील अतिक्रमण काढले. आगामी काळात निवडणुका आहेत. समान वागणूक द्या. कायदा सुव्यवस्थेसाठी झोकून काम करा असे मार्गदर्शक केले.
शिंदे यांचे कार्य वाखाणण्या जोगे
अध्यक्षीय भाषणात नूतन पोलिस अधीक्षक श्री. उगले यांनी शिंदे माझे वर्गमित्र आहेत, त्यांचे कार्य वाग्यानाजोगे आहे असे सांगून कौतुक केले. मला अजून दोन दिवस झाले आहे. जिल्ह्यातील जनतेच्या हितासाठी, शांतता व कायदा सुव्यवस्थेसाठी कार्य करीन. मनुष्य बळाचा योग्य वापर करून चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न असेन असेही ते म्हणाले.