दत्त जयंती निमित्त मोफत वैद्यकीय सेवा शिबिर

0

पुणे : दत्त जयंती निमित्त आज श्री क्षेत्र गगनगीरी महाराज आश्रम गगनगढ,जिल्हा कोल्हापूर येथे यात्रे साठीआलेल्या भाविकांसाठी वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्ट तर्फे दर वर्षी प्रमाणे मोफत वैद्यकीय सेवा व मोफत औषधे  शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यात्रेसाठी कोंकण,कर्नाटक व महाराष्ट्रतुन लाखो लोक आलेले आहेत.

या शिबिराचे आयोजन पुणे जिल्हा वारी व्यवस्थापन समिती पुणेचे अध्यक्ष मुकेश सोमैय्या, विश्र्वस्त श्री राम नलावडे, डॉ. पोपट कुंभार, डॉ. अशोक चव्हाण, राजाराम रेणुसे विजय नलावडे, संतोष नलावडे यानी केले आहे.