‘दबंग-३’ च्या शूटिंगला होणार सुरुवात

0

मुंबई : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानसाठी २०१९ हे वर्ष विशेष महत्वाचे ठरणार आहे. या वर्षात त्याचा बहूप्रतिक्षित ‘भारत’ हा चित्रपट रिलीझ होणार आहे. त्यानंतर ‘दबंग-३’ चित्रपटाच्याही शूटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे.

या वेळीस ‘दबंग-३’चे दिग्दर्शन प्रभूदेवा करणार आहे. सलमान खानने प्रभूदेवासोबत यापूर्वी ‘वान्टेड’ या चित्रपटात काम केले होते. सप्टेंबर २०१८मध्ये ‘दबंग’ चित्रपटाला आठ वर्षे पूर्ण झाले. या चित्रपटातून सोनाक्षी सिन्हाने बॉलिवूड डेब्यू केले होते. सोनाक्षीने दबंग-२मध्येही भूमिका साकारली होती. आता तिसऱ्या भागातही ती झळकणार असल्याचे बोलले जात आहे.