नागपूर। नागपूरमधील आमदार निवासातील सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीने शुक्रवारी रात्री आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. राज्य महिला आयोगाच्या सदस्या नीता ठाकरे यांनी ही माहिती दिली. नैराश्यातून तिनं आपलं आयुष्य संपवण्याचं टोकाचं पाऊल उचललं. शिवाय आरोपींच्या ओळखीच्या लोकांनी पीडित मुलीच्या कुटुंबावर प्रकरण मागे घेण्यासाठी दबाव आणला जात असल्याचीही माहिती समोर येत आहे.
सराफा दुकानात काम करणा-या एका तरुणीवर सराफा व्यापारी मनोज भगत (44) तसेच तरुणीचा मित्र रजत मगरे (19) या दोघांनी सतत चार दिवस सामूहिक बलात्कार केला. आमदार निवासाच्या खोली क्रमांक 320 मध्ये ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणाचा बोभाटा झाल्याने प्रशासकीय यंत्रणेत प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.
मनोज भगतच्या दुकानात काम करणार्या 17 वर्षीय मुलीवर रजतची नजर होती. मनोज भगतनं पीडितेच्या घरी खोटं कारण सांगितले. मुलीला कुटुंबासह आग्रा येथे घेऊन जातो, असे खोटं सांगून तिला आमदार निवासात नेलं. मनोज भगत याने रजतसाठी सर्व व्यवस्था केली होती. पण पीडित मुलीला एकटं पाहून मनोजनंही तिच्यावर अत्याचार केले. आणि दोघांनी मिळून पीडित मुलीवर सामूहिक बलात्कार केला.