जळगाव । महाराष्ट्रात दबावामुळे नाईलाजाने सरकारला कर्जमाफी जाहीर करावी, लागली. असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जळगावातील कार्यक्रमात बोलतांना केला.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, कर्जमाफीची रक्कम ३४ हजार कोटी होती. मात्र जेव्हा प्रत्यक्षात वाटपाला सुरूवात झाली तेव्हा मात्र सरकारकडे पैसे नव्हते व त्यासाठी अर्ज करा तेव्हा कर्जमाफी मिळेल, असा निर्णय सरकारने घेतला. अर्ज होत ६६ रकान्यांचा, सहकार मंत्री व कृषी मंत्री यांनी हा अर्ज कुणाचीही मदत न घेता भरून दाखवाला असे, आव्हान पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले. आम्ही काही नवीन मागण्या केल्या नाही. जे आश्वासन या सरकाने दिली, त्या आश्वासनांची पृर्तता करा, अशी आमची साधी मागणी आहे. मात्र, एकही आश्वासन पूर्ण करण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. असेही पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले. नव्या नोकर्या तयार करायच्या असतील तर नवे कारखाने निघाले पाहिेजे, तसे पुरक वातावरण हवे, मात्र दोन कोटी रोजगार दरवर्षी निर्माण करू अस म्हणणार्या मोदी सरकारला हातचे रोजगार ही ठेवता आलेले नाही. दावोसमध्ये ३६ लोकांच शिष्टमंडळ गेले असून त्यावर पन्नास ते साठ कोटी रूपये खर्च होतात, असा आरोपही चव्हाण यांनी केला आहे. रेल्वेचे अपघात रोखण्यासाठी व आधुनिकरण करण्यासाठी एकलाख कोटी रूपये लागतील. भारताच्या रेल्वेत २ कोटी ७० लाख लोक रोज प्रवास करतात, अशा परिस्थितीत बुलेट ट्रेन मागितली होती कुणी, विमानाने एका तासात ३ हजार रूपयात जाता येतय, बुलेट ट्रेनने तीन तास लागतात. मग बुलेट ट्रेन कशासाठी, यासंदर्भातील निविदांची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणीही चव्हाण यांनी याप्रसंगी केली. हा माणूस देशाचा पंतप्रधान आहे का गुजरातचा हेच मला समजत नाही, असे टिकास्त्र पृथ्वीराज चव्हाण यांनी याप्रसंगी सोडले.