दमदार पावसाच्या हजेरीत पाचदिवसीय श्रींचे विसर्जन

0

शहादा । शहरात पहिल्या ट्प्प्यातील गणेश विसर्जन मिरवणुका महात्मा गांधी पुतळा पासुन सुरु झाल्या. सायंकाळी उशीरापर्यंत मिरवणूका शांततेत सुरु होत्या. शहरातील एकुण आठ गणेश मंडळानी विसर्जन मिरवणूकात सहभाग घेतला होता. यात शहादा तालुका शिवसेना , चर्मकार गणेश मंडळ , महात्मा ज्योतीबा फुले समाज मंडळ स्विपर कॉलनी वृंदावन नगर या प्रमुख मंडळांचा समावेश होता. मिरवणूका महात्मा गांधी पुतळा ,चार रस्ता , जामा मशिद चौक , मेनरोड तुप बाजार , शहीद लालदास चौक , आझाद चौक , कुकडेल मार्गे काढण्यात आली. गणेश भक्तांमध्ये कमालीचा उत्साह होता. शिवसेनेने आकर्षक मिरवणुक केली आहे . शिवसेना तालुकाप्रमुख मधुकर मिस्तरी, शहर प्रमुख बापू चौधरी सह शिवसेनेचे पदाधिकारी सहभागी होते.

गणेशभक्तांची उडाली तारांबळ
आज सकाळपासुन शहरासह परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. संततधार सुरु असलेल्या पावसामुळे गणेशभक्तांची तारांबळ उडाली होती. पावसातच मिरवणूका सुरु होत्या. शहरात कमालीचा मोठा पोलीस बंदोबस्त होता त्यात सर्वात मोठा पोलीस बंदोबस्त जामामशिद चौक, आझाद चौक व तुप बाजार परिसरात चारही बाजुला सरंक्षण कठडे लावुन मार्ग बंद केले आहेत. जामा मशिद चौकाजवळ उपविभागीय पोलीस अधिकारी एम. बी. पाटील, प्रांत अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसिलदार मनोज खैरनार , नायब तहसिलदार डॉ देवरे , वाय. डी. पाटील, पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत सह सारंगखेडा ,म्हसावद, व धडगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी , ज्येष्ठ नेते डॉ. टाटीया, माजी शिवसेना प्रमुख अरुण चौधरी, शाम जाधव, पोलीस पाटील, भगवान पाटील, आरपीआय जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर, माकपाचे सुनिल गायकवाड, माजी नगरसेवक संजय चौधरी, ज्ञानेश्वर चौधरी , सुपडु खेडकर, भाजपा शहर अध्यक्ष जितेंद्र जमदाळेसह शांतता कमेटी सदस्य व नगरसेवक उपस्थित होते. गोमाईनदीला प्रथमच मोठा पुर आला आहे. काही नोंदणीकृत गणेश मंडळांनी रात्री उशीरा किंवा सकाळी प्रकाशा नदीपात्रात विसर्जन केले.