दमदार पावसाने ‘भीमा’ तुडुंब भरली

0

शिरूर : तालुक्यातील कोरेगाव, धानोरे, विठ्ठलवाडी, टाकळी भीमा, शिवतक्रार म्हाळुंगी आणि इतर गावाशेजारून भीमा नदी वाहत आहे. सध्या नदीला पाणी आल्यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

संपूर्ण तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने पाण्याचा प्रश्न सुटला आहे. शिरूरच्या अनेक भागांमध्ये शेतकर्‍यांची शेती व काही ग्रामपंचायत वापरण्यासाठी पाणी याच नदीवरील बंधार्‍यातून उपसा करून पुरवठा केला जात आहे. ग्रामपंचायत अंतर्गत संपूर्ण गावाला पाणीपुरवठा केला जातो.

भीमा नदीच्या बाजूने ज्या शेतकर्‍याची विहिरी आहे. त्या सर्व विहिरींची पाण्याची पातळीत वाढ झाली आहे. सगळीकडे चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत. अनेक भागांमध्ये मुसळधार तर, काही भागात रिमझिम पाऊस झाला. तसेच या नदीला मिळणारे छोटे-मोठे ओढे नाले खळखळून वाहत आहत. त्यामुळे नदीवरील बंधारा तुडुंब भरले आहेत. तालुक्याच्या पश्चिम पट्टयात संतधार सुरु असल्यामुळे नदीच्या पाणी पातळी वाढ झाली आहे. पूर्व भागातील शेतकर्‍यांना याचा फायदा झालेला दिसत आहे. त्याचबरोबर किरकोळ मासेमारी व्यावसायिक सुखावला असून या पाण्यामुळे अनेकांना फायदा झाला आहे.