नैरोबी । भारताच्या 16 वर्षीय दमनीत सिंगने ऐतिहासिक कामगिरी करताना 18 वर्ष गटाच्या जागतिक अजिंक्यपद मैदानी स्पर्धेत देशाला पहिले पदक मिळवून दिले. दमनीतने 5 किलो हातोडाफेकीत वैयक्तिक कामगिरीचा उच्चांक नोंदवताना 74.20 मीटर अशी हातोडाफेक करत देशाला रौप्यपदक मिळवून दिले. युक्रेनचा कोक्हन मिखायलो (82.31 मीटर) हा सुवर्णपदाकचा मानकरि ठरला. जर्मनीचा रफाएल विंक्लेवॉस 71.78 मीटर अशा कामगिरीसह तिसर्या स्थानावर राहिला.
स्वत:चे उच्चांक मोडले
दमनीतने वर्षाच्या सुरुवातीला हैदराबादमधील राष्ट्रीय युवा मैदानी स्पर्धेत 72.75 मीटरचा उच्चांक केला होता. जागतिक स्पर्धेत दमनीतने आपला उच्चांक सतत चार वेळा मोडला. दमनीतने पहिल्या फेकीतच 1.45 मीटरहून जास्त कामगिरी करत जुना उच्चांक पुसून टाकला. त्यानंतर दमनीत रौप्यपदक विजेती कामगिरी साधली.