दरड कोसळल्याने मलकापूर-सोलापूर रस्ता वाहतुकीसाठी बंद

0

बुलडाणा : शहरापासून 7 किमी अंतरावर असलेल्या राजूर घाटात रस्त्यावरील दरड कोसळली आहे. त्यामुळे रात्री 7 वाजल्यापासून मलकापूर-सोलापूर रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

सायंकाळच्या सुमारास मुसळधार पाऊस झाल्याने राजूर घाटातील रस्त्याखालील जमीन पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेल्याने निम्मा-अधिक रस्ता वाहून गेला. त्यामुळे मंगळवारी रात्रीपासून रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सध्या रस्ता दुरस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. रस्ता वाहतुकीसाठी लवकरात लवकर खुला करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यानी सांगितले आहे. तसेच या रास्त्यावरुन धावणार्‍या एसटी बसेसची वाहतूक बोथामार्गे ढोरपगावकडून वळवण्यात आली आहे, अशी माहिती विभागीय नियंत्रक अधिकारी मेहतर यानी दिली आहे. रस्ता दुरस्तीसाठी आणखी 10 ते 12 दिवस लागण्याची शक्यता असल्याने जड वाहण्याची वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आहे.