दररोज सकाळी 6 वाजल्यापासून बदलणार पेट्रोल, डिझेलचे दर

0

मुंबई: तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दररोज बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल 1.12 रुपयांनी, तर डिझेलच्या दरात 1.24 रुपयांची कपात झाली होती. दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पहिले दोन दिवस तरी ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. कारण मुंबईत आज पेट्रोल 12 पैशांनी, तर डिझेल 22 पैशांनी स्वस्त झाले आहे. विविध शहरातील हे दर उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत कायम राहतील. त्यानंतर नव्या दरांनुसार पेट्रोल, डिझेलची विक्री केली जाईल. पेट्रोल पंप मालक आणि डिलर्स यांना फटका बसू नये, यासाठी देशभरातील 54 हजार पेट्रोल पंपांवर रात्री 12 ऐवजी सकाळी 6 वाजल्यापासून दर बदलणार आहे.

पाच शहरात यशस्वी प्रयोग
कच्च्या तेलाचे दर नियमित ठरतात, त्यामुळे भारतातही दररोज दरात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. जगभरातील अनेक विकसित देशांमध्ये हा नियम अगोदरपासूनच लागू आहे. तेल कंपन्यांनी उदयपूर, जमशेदपूर, पुद्दुचेरी, चंदीगड आणि विशाखापट्टणम या शहरांमध्ये प्रायोगिक तत्तांवर दररोज दर बदलण्याचा नियम लागू केला. या शहरांमध्ये हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर देशभरात हा नियम लागू करण्यात आला.