दरवर्षी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त एनडीआरएफच्या जवानांना देणार पुरस्कार

0

नवी दिल्ली – नवी दिल्लीत आज राष्ट्रीय पोलीस स्मारकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. वेगवेगळ्या राज्यांमध्ये शहीद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना यावेळी पंतप्रधान मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली. दरम्यान यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलातील (एनडीआरएफ) जवानांसाठी आता प्रत्येक वर्षी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त (23 जानेवारी) त्यांच्या नावाच्या पुरस्काराने सन्मानित केले जाणार असल्याची घोषणा केली.

यावेळी पोलीस आणि निमलष्करी दलाच्या जवानांच्या शौर्याची आठवण काढताना पंतप्रधान मोदी काहीसे भावूक झाले.

पंतप्रधान मोदी सुभाष चंद्र बोस आणि आझाद हिंद सेनेच्या आठवणी ताज्या करण्यासाठी अंदमान-निकोबार येथे जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते सेल्युलर कारागृहाला भेट देणार आहेत. जेथे स्वातंत्र्यसाठी लढणाऱ्या सैनिकांना काळ्या पाण्याची शिक्षा दिली जायची. वेगवेगळ्या राज्यांमध्ये शहीद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना यावेळी पंतप्रधान मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनीही शहिदांना आदरांजली वाहिली.