दरवाजा उघडा ठेवून झोपले, चोरट्याने उशाशी ठेवलेले चार मोबाईल लांबविले

0

जळगाव – दरवाजा उघडा ठेवून झोपणे तरुणींना चांगलेच महागात पडले आहे. तरुणींनी आपल्या उशीशी ठेवलेले चार मोबाईल चोरट्यांनी लांबविल्याची घटना गुरुवारी सकाळी 8 वाजता गणेश कॉलनी परिसरातील गणगोपी अपार्टमेंटमध्ये घडली.

सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, आसाम राज्यातील सायरीन क्लो (वय-27), अर्चू खॅानाजाईन (वय-20), तेन्झीन शिआंमी (वय-30) आणि रोझ खाऊकिंप या चार तरुणी शहरातील गणेश कॉलनीत गणगोपी अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास आहेत. त्या सी शॉ फॅमिली स्पॉ नावाने रिंगरोड परिसरात असलेल्या दुकानावर कामाला आहेत. बुधवारी रात्री चौघेही नेहमीप्रमाणे झोपल्या. काही कामानिमित्ताने सकाळी 7 वाजता दरवाजा उघडा केला. व पुन्हा झोपल्या. यावेळी चौघांनी आपआपल्या उशाशी मोबाईल ठेवले होते. झोपेत असतांना, दरवाजा उघडा असल्यांची संधी साधत चोरट्यांनी चौघांचे उशाशी ठेवलेले मोबाईल लांबविले. चौघेही उठल्यावर त्यांना आपले मोबाईल दिसून आले. इतरत्र शोध घेतल्यावरही मिळून न आल्याने सायरीनसह अर्चू, तेन्झीम या तिघांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रारीसाठी धाव घेतली. तक्रारीवरुन जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.