दरवाजा बंद केल्याच्या वादातून एकाचे डोके फोडले

0

धुळे । पाणी भरण्यासाठी दरवाजा उघडला तो बंद करुन घेण्यास सांगितल्यावरुन वाद होवून एकाचे डोके फोडल्याची घटना पाच दिवसांपूर्वी सिद्दीकी नगरात घडली. याप्रकरणी दि.18 रोजी पोलिसात तक्रार केल्याने गुन्हा दाखल झाला आहे. सिद्दीकी नगरातील इकबाल हाजीचाचा लुम कारखान्यात काम करणार्‍या म.आबदी म.शरीफ अन्सारी हा दि.13 मे रोजी सकाळी 11.30वाजता लुमचा मागील दरवाजा उघडून पाणी भरण्यास गेला असता साजिद सलिम अन्सारी याने त्यास दरवाजा बंद करुन घेण्यास सांगितले. पाणी भरुन झाले की दरवाजा बंद करतो असे आबिदने सांगूनही राग आलेल्या साजीदने त्याला शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच बोअरींग जवळची स्टिलची बादली डोक्यात मारुन जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी म.आबीद याने चाळीसगावरोड पोलीस ठाण्यात काल तक्रार केली असून साजिद अन्सारीवर गुन्हा दाखल झाला आहे.