रक्कम सरकारला होणार दान ; प्रवर्तन चौकात तीन तास आंदोलन
मुक्ताईनगर:- पेट्रोलसह डिझेल व जीवनावश्यक वस्तूंच्या दरात भस्मासुरासारखी प्रचंड दरवाढ झाल्याच्या निषेधार्थ येथील काँग्रेस पदाधिकार्यांच्या वतीने शहरातील प्रवर्तन चौक ते आठवडे बाजारादरम्यान रविवारी दुपारी भीक मांगो आंदोलन केले. आंदोलनातून जमा झालेली एकूण एक हजार 739 रुपयांची रक्कम सरकारला दान देण्यात येणार आहे. केंद्रासह राज्यात सत्तेवर बसलेल्या भाजप सरकारने दिवसेंदिवस जीवनावश्यक वस्तूंची प्रचंड महागाई केल्याने सर्वसामान्य जनतेचे पार कंबरडे मोडले आहे.
तीन तास भीक मांगो आंदोलन
पोकळ आश्वासने देवून सत्ता काबीज केलेल्या भाजपाने दर दिवसाला पेट्रोल, डिझेल दरवाढ सुरू आहे. ही महागाई सर्वसामान्य जनतेच्या खिशाला परवडणारी नसून या दरवाढीच्या निषेधार्थ तालुका काँग्रेसतर्फे जिल्हा सरचिटणीस डॉ.जगदीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहरातील प्रवर्तन चौकातील दुकाने तसेच आठवडे बाजारात रविवारी दुपारी दोन ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत असे तब्बल तीन तास जाहीर भीक मांगो आंदोलन करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
तालुकाध्यक्ष आत्माराम जाधव, जिल्हा सचिव आसीफ खान, ईस्माईल खान, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर पाटील, बी.डी.गवई, डॉ.विष्णु रोटे, अॅड.अरविंद गोसावी, मारोती सुरडकर, शहराध्यक्ष आलम शहा, अतुल जावरे, पांडुरंग राठोड, अरुण कांडेलकर, अनिल सोनवणे, कुसुम पाटील, युवराज जाधव, हाजी युनूस खान, हिरासिंग चव्हाण, दादाराव पाटील, प्रा.सुभाष पाटील, रामभाऊ महाले, रघुनाथ पाटील, गुनाजी इंगळे, महेमूद शेख, मधुकर भगत, शाहरुख खान, रामराव पाटील, आर.के.गणेश, फिरोज शेख टेलर, आनंदा कोळी, महेश खुळे, मुकेश वाकोडे, शेख रमजान, बाबू पटेल, कासम ठेकेदार, सोनुसिंग पवार आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.