शिंदखेडा। तालुक्यातील दराने फाट्यावर धुळे शहादा एसटी बसने समोरून धडक दिल्याने समोरून येणार्या मोटारसायकल स्वरास जोरदार धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला.
ओव्हरटेक करण्याच्या नादात अपघात झाल्याची चर्चा
शहादा जिल्हा नंदुरबार आजाराची एसटी बस धुळे येथून शहाद्याकडे जात होती. या बसपुढे दोन एसटी बसेस जात होत्या. त्यांना ओहरटेक करण्याचया नादात मोटारसायकल स्वरास जोरदार धडक बसली. धडक एवढी जबरदस्त होती कि मोटारसायकल अपघात स्थळापासून किमान 200 फूट फरफटत गेली. तर दोघेही मोटारसायकल स्वार रस्त्यापासून दूर खड्यात फेकले गेले. मयत मोटारसायकल चालवणारा दराने येथील रहिवाशी आहे. मनीष विनायक पवार वय 23 असे त्याचे नाव आहे. तर दुसरा मयत खंडू पुंजू पाटील वय अंदाजे45 हा दोंडाईचा येथील रहिवाशी आहे. हा व्यक्ती दोंडाईचा येथील खाजगी ठेकेदार के जी पाटील यांच्याकडे मिस्त्री कामावर होता. अपघातग्रस्त मोटार सायकल पॅशन प्रो कम्पनीची होती या वाहनाचा दर्शनी भाग पूर्णपणे तुटून गेल्याचे दिसत आहे.
बसचालक ताब्यात
सदर अपघात दुपारी दोनच्या सुमारास घडला घटनास्थळी शिवसेना कार्यकर्ते मनोज पवार यासह माजी सरपंच रोहिदास पवार माजी ग्राम पंचायत सदस्य प्रा. देविदास आत्माराम पवार व इतर उपस्थित होते. मयत व्यक्तींचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालय प्रमुख वी विनय पवार यांनी करून शव नातेवाइकांच्या ताब्यात दिले. शिंदखेडा पोलिसनी शहादा आगाराची बस ताब्यात घेतली असून चालक (ड्रायवर) जितेंद्र सूर्यवंशी राहणार फागणे तालुकजिल्हा धुळे यालाही ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पीएसआय चव्हाण करीत आहे.