दरेगाव विकासोवर स्वामी समर्थ पॅनलचा झेंडा

0

चाळीसगाव । आमदार उन्मेश पाटील यांचे गाव असलेल्या दरेगाव विकास सोसायटीवर भारतीय जनता पार्टी पुरस्कृत स्वामी समर्थ पॅनलने 13 जागांपैकी 12 जागा जिंकत आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले तर राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत त्यांनी पुरस्कृत केलेल्या क्रांती पॅनलला केवळ 1 जागेवर समाधान मानावे लागले. 1949 च्या स्थापनेनंतर इतिहासात प्रथमच दरेगाव-पिंपळवाडी तांडा – विसापूर या गावांची एकत्र असलेल्या विकासोची निवडणूक झाली.आमदार उन्मेशदादा पाटील यांचे बंधू भास्करराव माधवराव पाटील (बागल सर) यांनी सन 2011 पासून भैय्यासाहेब बाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे कामकाज पाहत असताना संस्थेची स्वतःची मालकीची जागा नसून देखील ती त्यांच्याकडून मोफत घेऊन लोकवर्गणीच्या माध्यमातून सुसज्ज अशी इमारत बांधली त्याचप्रमाणे सभासदांना सर्व सुविधा पुरवण्याचे नियोजन केले होते. याच कामाची व आमदार उन्मेशदादा पाटील यांच्यावर असलेल्या विश्वासाची ही पावती असल्याची प्रतिक्रिया भास्करराव माधवराव पाटील (बागल सर) यांनी दिली.

निवडीसाठी यांनी दिला पाठिंबा: निवडून आलेल्या सदस्यांमध्ये भास्करराव पाटील (बागल सर), अनंत पाटील, दिलीप पाटील, भिकन पाटील, राजेंद्र माळी, ज्ञानेश्वर माळी, शारदा पाटील, उषाबाई राठोड, रघुनाथ पगारे ( बिनविरोध), काशिनाथ राठोड (बिनविरोध), महादू धनगर, राजेंद्र धनगर व क्रांती पॅनलचे मनोज पाटील यांनी स्वामी समर्थ पॅनलला पाठींबा दिला आहे.