दरेगाव विकासोवर स्वामी समर्थ पॅनलचा झेंडा

0

चाळीसगाव । तालुक्यातील दरेगाव येथिल विविध कार्यकारी सोसायटीची निवडीबद्दल अनेक दिवसांपासून चर्चा सुरू असतांना गेल्या महिन्यात झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत क्रांती पॅनलचा धुव्वा उडवून विजयाचा झेंडा रोवणार्‍या स्वामी समर्थ पॅनलतर्फे चेअरमनपदी भास्करराव माधवराव पाटील (बागल सर) तर व्हाईस चेअरमनपदी उषाबाई भीमराव राठोड यांची यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

या स्थुत्य निवडीबद्दल चाळीसगाव तालुक्याच्या सर्व स्तरातून अभिनंदन होत असून चाळीसगाव तालुक्याचे आमदार उन्मेश पाटील यांनी देखील चेअरमन व व्हा.चेअरमन यांचे अभिनंदन केले आहे. भास्करराव पाटील यांनी यापूर्वी देखील दरेगाव विकासोची धुरा सांभाळली होती. त्या अनुभवाच्या आणि आमदार उन्मेश पाटील यांच्या मार्गदर्शनाने पुढील काळात संस्था आणि सभासदांच्या हितासाठी काम करणार असल्याची प्रतिक्रिया भास्करराव पाटील यांनी दिली.