दरेगाव शिवारात बालकावर बिबट्याचा पुन्हा हल्ला

0

चाळीसगाव । तालुक्यातील वरखेडे शिवारापासून अवघ्या 4 किलोमिटर अंतरावर असलेल्या दरेगाव शिवारातील चंदरसिंग भिल्ल यांच्या आठ वर्षीय मुलगा आज दुपारी 4 वाजेच्या सुमारास स्वतःच्या शेतात पत्नीसह कापूस वेचण्याचे काम करत असतांना बिबट्याने बालकावर हल्ला केला, मात्र प्रसंगावधान थोडक्यात बचावला असून निसटत्या हल्ल्यात मानेवर जखमा झाल्या आहे. याबाबत माहिती मिळताच वरखेडे येथे आगोदर पासून तैनात असलेला वनविभागाचे कर्मचारी व अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमी झालेल्या बालकाला 108 अ‍ॅम्बुलन्स बोलावून उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे.

बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी
यावेळी वनकर्मचारीचे दोन वाहने, दोन शॉर्पशुटर, 20 वनविभागाचे कर्मचारी, एसआरपीचे दोन जवान आणि वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मोरे यांच्या सह इतर अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती. वारंवार होणार्‍या या घटनांमुळे परीसरातील नागरीक व शेतकरी यांच्या दहशत पसरली असून वनविभागाच्या भोंगळ कारभारामुळे एकामागून एक हल्ले होत आहे. त्वरील बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी होत आहे.